जामनेरचे किंग गिरीश महाजनच : बालेकिल्ला ठेवला अभेद्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । जामनेर बाजार समिती संचालक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’ तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला असून विरोधांना पराभवाच पाणी पाजलं आहे. त्यांनी विरोधकांना क्लीन स्वीप देत सर्व १८ जागांवर आघाडी मिळविली आहे.

जामनेर बाजार समितीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपची पुन्हा सत्ता आली आहे. .एक जागावरअगोदरच भाजपने बिनविरोध जिंकली होती. उर्वरीत सतरा जागांवर मतदान झाले.

आजच्या मतमोजणीत सोसायटी मतदार संघातील सातही जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. तर इतर मतदार संघातही सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व अठरा जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत.