जळगाव लाईव्ह न्यूज । आला उन्हाळा तब्येतीला सांभाळा, असे आपण म्हणतो. उन्हाळ्यात उनं लागणे किंवा उष्माघात होेते याचे प्रमाण जास्त असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने निर्माण होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे, किडनी स्टोन! जळगावमध्ये तर तापमानाचा पारा ४५ अंशावरच असतो. यामुळे एप्रिल-मे महिन्यात जळगावसारख्या उष्ण भागांमध्ये किडनी स्टोनची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. किडनी स्टोन (Kidney Stone) म्हणजेच मुतखड्याचा (हिंदीत याला पथरी असे म्हणतात) त्रास उन्हाळ्यात बरेचदा डोके वर काढतो. जेव्हा युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक सिड आणि ऑक्झालेट या घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते एकत्र येऊ लागतात, तेव्हा युरिन ट्रॅकमध्ये आणि किडनीमध्येही त्याच्या गाठी तयार होतात. त्यालाच आपण किडनी स्टोन किंवा मुतखडा असे म्हणतो. यामुळे उन्हाळ्यात या आजाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
उष्ण हवामानामुळे डिहायड्रेशन होऊन मुतखडा तयार होतो. कारण बर्याच व्यक्ती पुरेसे पाणी पीत नाहीत आणि ते डिहायड्रेशनला कारणीभूत ठरते. ज्यामुळे मूत्रात कॅल्शियम आणि इतर खनिजे घनरूप होण्यास आणि न्यूक्लियस नावाच्या लहान दगडांमध्ये बदलण्यास मदत करतात. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे निर्जलीकरणामुळे खडे तयार होतात. त्यामुळेच ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी आणि आहाराची काही पथ्ये आवर्जून पाळावीत.
मुतखडा टाळण्यासाठी काय करावे?
किडनी स्टोन टाळण्यासाठी सर्वात सोपा आणि साधा उपाय म्हणजे चांगले हायड्रेटेड राहणे. म्हणजे उन्हाळ्यात अधिकाधिक द्रवपदार्थ घ्या. या ऋतूत, जेव्हा तुम्ही व्यायाम करत असाल किंवा खेळ खेळत असाल, तेव्हा नक्कीच द्रवपदार्थ घ्या. साध्या पाण्यापासून ते फळांचे रस आणि भाज्यांच्या रसापर्यंत द्रव पदार्थांचा आहारात पुरेसा उपयोग करा. मात्र, आपले आरोग्य आणि साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासाठी, नॉन-कॅलरी किंवा कमी-कॅलरी पेये पिणे चांगले आहे. अल्कोहोलयुक्त पेये टाळा कारण ते द्रव कमी करतात आणि अनावश्यक कॅलरीज वाढवतात.
किडनीस्टोन (मुतखडा) विषयी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी येथे क्लिक करा.उन्हाळ्यात मुतखड्याचा त्रास वाढू नये म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
१. शरीरातील पाणी पातळी संतुलित राखण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दररोज दोन ते साडेतीन लीटर पाणी प्यावे.
२. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रक्रिया केलेले पॅकींगचे अन्नपदार्थ तसेच जास्त मीठ असणारे खारवलेले पदार्थ खाणे टाळावे.
३. उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे. हे ड्रिंक्स खूप जास्त सिडीक असतात. शरीरातील सिडिक घटक वाढले की मुतखड्याचा त्रास वाढू शकतो.
३. उन्हाळ्याचे २ महिने कॅल्शियमचा वापरही मर्यादित असावा. पण यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
४. उन्हाळ्यात हाय प्रोटीन डाएट घेणे तसेच खूप जास्त गोड पदार्थ खाणे टाळावे, यामुळेही किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.
५. इतर काही आजारांमुळे अॅण्टीबायोटिक्सचा हेवी डोस सुरू असेल तरीही त्या गोळ्यांमध्ये असणार्या घटकांमुळे किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे या बाबतीत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधींमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा.
तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या मोफत मार्गदर्शनासाठी कॉल करा: 8412913931
किडनीस्टोन (मुतखडा) प्रतिबंधात्मक उपाय
१. अधिक काळ लघवी रोखून धरू नका.
२. मूत्रमार्गावर संसर्ग झाल्यास वेळेत उपचार करा.
३. मीठ, टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे मुतखडा निर्मितीला पुरक असे पदार्थ आहेत. त्यांचे सेवन कमी करावे.
४. नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मुतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात.
५. दिवसभरात बारा ते सोळा ग्लास म्हणजे तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
किडनीस्टोन (मुतखडा) चे लक्षणे
१. सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
२. मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या मोफत मार्गदर्शनासाठी कॉल करा: 8412913931
मुतखड्यावर विनाऑपरेशन १०० टक्के उपचार शक्य, वाचा काय म्हणणे आहे तज्ञांचे
होमिओपॅथी तज्ञ डॉ. रितेश पाटील Dr Ritesh Patil Jalgaon सांगतात की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम खूप येतो. अनेकवेळा आपण पुरसे पाणीही पित नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी शस्त्रक्रियाच करावी लागते, असा अनेकांचा समज आहे. मात्र होमिओपॅथीने मुतखडा पुर्णपणे बरा होतो. विनाऑपरेशन उपचार केवल होमिओपॅथीक पध्दतीच शक्य आहे. होमिओपॅथीक उपचार पध्दतीने लघवीच्या नळीतील (युरेटर) १२ एमएमचे खडे तीन आठवड्यात तर किडनीतील २० एमएम पर्यंतचे खडे सुमारे ३ ते ४ महिन्यात अत्यंत कमी खर्चात निघू शकतात, असे डॉ.रितेश पाटील यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी व डॉ.रितेश पाटील यांच्या सल्ल्यासाठी https://bit.ly/RamnandaClinic या लिंकवर क्लिक करा.
तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या मोफत मार्गदर्शनासाठी कॉल करा: 8412913931