⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

खिर्डी बु! ग्रामपंचायतकडून तणनाशक व डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे अनेक परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया या आजारांचे शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावधान होणे गरजेचे असल्याने अनेक ठिकाणी तणनाशक व डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी केली जात असून खिर्डी बु! ग्रामपंचायतकडून देखील तणनाशक व डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी केली जात आहे.

रावेर तालुक्यातील खिर्डी येथे डेंग्यू, मलेरिया या आजारांचे शिरकाव होऊ नये म्हणून गावातील सुज्ञ नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला तणनाशक व डास प्रतिबंधत्मक फवारणी करण्याची मागणी केली होती. खिर्डी बु! येथील सरपंच मधुकर ठाकूर यांनी त्वरित दखल घेत गावभर इलेक्ट्रॉनिक शेती पंपच्या साह्याने फवारणीला सुरवात केली. सध्या बेमोसमी पाऊस पडत असल्याने, सांडपाणी वं गटारी तुंबल्याने तसेच उष्ण व दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर दाट लोकवस्तीत डास मोठ्या प्रमाणात आढळतात.

डासांच्या नियंत्रणाकरीता स्थानिक प्रशासनाने पाउले उचलत इलेक्ट्रॉनिक पंप माध्यमातून फवारणीला सुरवात केली असून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. तसेच यामुळे गावात डासांची उत्पत्ती कमी होऊन उद्भवणाऱ्या आजरापासून बचाव होईल. गल्लीबोळात फवारणी करून डास नियंत्रित करण्याकरिता सरपंच मधुकर ठाकूर यांनी लवकर प्रयत्न केल्याने समाधान व्यक्त होत आहे. डास प्रतिबंधत्मक फवारणी करताना कर्मचारी डीगंबर तावडे, संदिप भोलाणे, काशिनाथ मालखेडे भूषण कोळी, व युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे उपस्थित होते.