⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केले ‘इतके’ टक्के खरीपाच्या पेरण्या..

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केले ‘इतके’ टक्के खरीपाच्या पेरण्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जून महिना संपत आला असता तरीही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता.मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या ५४.८३ टक्के पूर्ण केल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला.

यंदा राज्यात वेळेआधी मान्सून दाखल झाला. यांनतर दोन चार दिवस काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र त्यांनतर पावसाने उसंती घेतली. अशातच राज्यासह जळगावमध्ये मान्सून सक्रिय झाल्याने गेल्या रविवारी (ता. २३) जिल्ह्यात कोठेना कोठे पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. उर्वरित पेरण्याही लवकर पूर्ण होतील, अशी आशा आहे. जूनमध्ये मॉन्सूनने हवी तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये खरिपाबाबत चिंतेचा सूर होता.

पाऊस पडण्यासाठी ढगही येतात, जमा होतात. मात्र, काही वेळाने ढग पाऊस पाडण्याविनाच निघून जातात, असा खेळ जिल्ह्यात सुरू होता. पाऊस पडण्यासाठी हवी तशी घनता ढगांसाठी तयार होत नव्हती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांत ढगही येतात आणी पाऊसही पडत आहे. मात्र, त्याचा जोर कमी अधिक प्रमाणात आहे.

४ लाख हेक्टवर पेरण्या
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख २२ हजार २०३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा कापसाचा झाला आहे. कापसाचे क्षेत्र ५ लाख १ हजार ५१६ हेक्टर होते. त्यापैकी ३ लाख ४० हजार ८४१ हेक्टरवर (६९.९६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
आतापर्यंत झालेल्या पेरण्या अशा

पीक–अपेक्षित क्षेत्र (हेक्टर)–प्रत्यक्षात झालेली पेरणी
कापूस–५०१५६१–३४०८४१
सोयाबीन–२९६३५–३७२९
ज्वारी–४४७३३–३०७५
बाजरी–१५७७४–२८६७
मका–९८०२५–५५५३६
तृणधान्य–२१३७–१७७५
तूर–१६५०३–६१२८
मूग–२८०९६–४२४०
उडीद–२६३१२–३२५२

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.