खडसेंच्या सत्तेला बोदवडमध्ये खिंडार, चंद्रकांत पाटलांनी फडकावला शिवसेनेचा भगवा

फेब्रुवारी 18, 2022 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून यातील सर्व १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर राष्ट्रवादी आघाडीवर तर शिवसेना पिछाडीवर असल्याचे दिसून येत होते मात्र आता हाती आलेल्या अंतिम निकालात शिवसेनेला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीला सात तर एका ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी सत्तांतर केल्यानंतर भाजपचा करिष्मा संपला असून शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटील यांची सरशी झाली आहे.

bodwad election shivsena

बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. भाजपचे नेते आ.गिरीश महाजन यांनी देखील निवडणुकीत आपली सूत्रे फिरवली असली तरी त्यांची सेनेसोबत छुपी युती असल्याचे बोलले जात होते. निकाल हाती आल्यानंतर अखेर भगवा फडकला असून शिवसेनेची सरशी झाली आहे.

निकाल पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ४ मधून  राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम  २११ मते यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक आठमध्येही राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला. त्यांनी   रेखा कैलास चौधरी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक ११ शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुध्दा शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.

प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेचे बागवान सईद  इब्राहिम बागवान यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादीचे शेख जाफर अल्ताफ यांनी ४०२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेख ईसलाईल यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १५ मधून देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला असून येथील पक्षाचे उमेदवार शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह यांनी६६२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पिंजारी शेख तौकीफ शेख अय्यूब यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार बेबाबाई विनोद माळी यांनी विजय मिळविला.

प्रभाग क्रमांक १७ मधूनही शिवसेनेच्या मिराबाई दिनेश माळी यांनी विजय मिळविला आहे.

हे देखील वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now