सावदा येथे कन्यापूजन कार्यक्रम

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । भारतीय जनता पार्टी व बेटी बचाव बेटी पढाओ अभियानांतर्गत सावदा येथे नुकताच अभियानाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त कन्यापुजन तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला. यावेळी बालीकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

savda jpg webp

याप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांनी महिलांना सन्मान दिल्यास आयुष्यात सुख समाधान येत असल्याचे नमुद केले तसेच महिला सन्मानासाठी फक्त चर्चा नव्हे तर कृती हवी असे खडे बोल सुनावले तसेच ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी केले. तालुका अध्यक्ष राजन लासुरकर व महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई बोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस महेश अकोले यांनी सुत्र संचालन केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सभापती कविताताई कोळी, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सावदा शहर अध्यक्ष जितेंद्र भारंबे, माझी सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष गजानन भार्गव, सरचिटणीस संतोष परदेशी, सर्वेश लोमटे व भाजप कार्यकर्त्ये व जनसमुदाय उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now