⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | बातम्या | शेतकऱ्यांनो नो चिंता! ! खरीपसाठी जून महिन्यात खतांचा सर्वाधिक साठा उपलब्ध होणार

शेतकऱ्यांनो नो चिंता! ! खरीपसाठी जून महिन्यात खतांचा सर्वाधिक साठा उपलब्ध होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । यंदा मान्सून वेळेआधी ३० मे रोजी केरळात दाखल झाला. यानंतर लवकरच महाराष्ट्रात धडक देईल. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या मंजूर आवंटनानुसार जून महिन्यात सर्वाधिक साठा उपलब्ध होणार आहे. मान्सून लांबणार नसल्याने आणि पेरण्या वेळेवर होणार असल्याने उपलब्ध होणारा साठा शेतकऱ्यांची फिरफिर टाळणार आहे.

राज्यामध्ये खरिपासाठी भरपूर खत उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर आपला खर्च तर वाढतोच, परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते, तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करणे आवश्यकी आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडे रासायनिक खतांचाच वापर असल्याने दिवसेंदिवस शेतजमिनी पोत खालावत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.

लूट थांबणार
जिल्ह्यातील अनेक विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करीत रासायनिक खतांची जादा दराने विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी महिनावार उपलब्ध खतांचे आवंटन पुरेसे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यार्च विक्रेत्यांना संधी मिळणार नाही, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्ता केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.