⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अधिकारी नसताना उजेड, कर्मचारी असताना अंधार ; जिल्हा परिषदेतील चित्र

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील हे कक्षात नसतांनाही त्यांच्या कक्षातील दोन पंखे, एसी, दिवे सर्व सुरू होते. दुसरीकडे वीज नसल्याने आरोग्य विभागासह काही विभागातील कर्मचारी मात्र, वीज नसल्याने अंधारात काम करीत होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हा विरोधाभास निदर्शनास आला.

वीज वाचवा असा संदेश शासनाकडूनच वारंवार दिला जात असताना शिक्षणाधिकारी पाटील यांच्या कक्षात मात्र, अनेक वेळा ते हजर नसताना विजेचा अपव्यय होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. मध्यंतरी अनेक वेळा वीजपुरवठा नसल्याने कामे थांबवावी लागली होती. कर्मचाऱ्यांना अंधारात कामे करावी लागली होती. तसेच काहीसे विचित्र चित्र जिल्हा परिषदेत शुक्रवारी होते.

आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग असा काही भाग अंधारात होता. मात्र, त्या आधी शिक्षणाधिकारी पाटील यांच्या कक्षात मात्र कोणीही नसताना सर्व यंत्रे सुरू होती. बाहेरील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता साहेब बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.