जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! सुवर्ण कारागिराचे बंद घर फोडून १५ लाखांचे दागिने लंपास

नोव्हेंबर 20, 2025 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात घरफोडीच्या काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच सोन्याचे दागिने बनवणाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह १५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी शहरातील गीताईनगरात उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

याबाबत असे की, जळगाव शहरामधील गीताई नगरातील मालचंद गौरीशंकर सोनी हे नातेवाइकाचे निधन झाल्याने कुटुंबासह राजस्थानातील गावी गेले होते. ते पाहून चोरट्यांनी १८ नोव्हेंबरच्या सकाळपासून ते १९ नोव्हेंबरच्या पहाटे ७.२५ वाजेच्या दरम्यान सोनी यांचे घर फोडले. ही घटना शेजारी अशोक सोनी यांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच मालचंद सोनी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मालचंद यांनी बुधवारी सकाळी साडेसात वाजता चुलत पुतण्या नरेंद्र सोनी याला चोरीबाबत माहिती दिली. त्यानंतर नरेंद्र व इतर नातेवाइकांसह गीताईनगर गाठले. तेव्हा घराच्या बाहेरील सेफ्टी डोअरचा कोयंडा कापलेला तसेच आतील लाकडी दरवाजाचाही कोयंडा तोडलेला दिसला. वरच्या मजल्यावरील मागच्या रूमचा दरवाजा तोडलेला दिसून आला.

चोरीला गेलेला ऐवज असा

५५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, १२ ग्रॅमची चेन, १० ग्रॅमचे ब्रेसलेट, १५ ग्रॅमचे झुमके, ४ ग्रॅमचे झुमके, ४ ग्रॅमची चेन, ५ ग्रॅमची इअररिंग, २ ग्रॅमची इअररिंग, २ ग्रॅमचे पेंडल, प्रत्येकी ८ ग्रॅम, ७ ग्रॅम, ५ ग्रॅम, ४ ग्रॅम, ३ ग्रॅमच्या दोन, २ ग्रॅम व१ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची फुली, ५०० ग्रॅम चांदीचे शिक्के, २०० ग्रॅमचे चांदीचे जोडवे व ५० हजारांची रोकड असा १५ लाख ७० हजारांचा ऐवज चोरी झाला. नरेंद्र सोनी यांनी फिर्याद दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now