जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून नवोदित कलाकार रूपा शास्त्री यांचा अभिनय असलेले गाणे आजच टी सिरीजच्या माध्यमातून रिलीज झाले आहे. साधना सरगम यांनी गायलेले गाणे अतिशय भावस्पर्शी असून अवघ्या काही वेळातच गाण्याचे २ हजारापेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. ‘जिंदगी तू ना मुझे आजमा’ असे गाण्याचे बोल असून अकाली अंधत्व आलेल्या मुलीला कुटुंबाकडून मिळालेली वागणूक गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या रूपा शास्त्री यांनी वर्षभरात यशाचे अनेक टप्पे सर केले आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात आपली छबी उमटविल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. टी सिरीजकडून ‘जिंदगी तू ना मुझे आजमा’ हे गाणे आजच युट्युब प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. अतिशय भावस्पर्शी असलेल्या या गाण्यात चिमुकलीला अचानक अंधत्व येते आणि त्यानंतर तिला आई-वडिलांकडून मिळालेली वागणूक, कुटुंबियांनी अंधशाळेचा दाखविलेला रस्ता, अंधत्व असूनही त्या मुलीने यश संपादन करताच आई-वडील पुन्हा तिला जवळ करू पाहतात.
कुटुंबाकडून मिळालेली वागणूक, डोळ्यांसमोर आलेला अंधार आणि त्यातून फुलविले जीवन असा सर्व प्रवास संगीता गोलाणी यांनी गाण्याच्या माध्यमातून मांडला आहे. साधना सरगम यांनी गायलेले गाणे टी सिरीजने रिलीज केले आहे. रूपा शास्त्री यांनी गाण्यात प्रज्ञाचक्षु मुलीच्या तरुणपणाची भूमिका साकारलेली आहे. तसेच गाणे गाणारी व्यक्तीची भुमिका देखील रूपा शास्त्री यांनी साकारली आहे.
गाणे ऐकण्यासाठी क्लीक करा :