⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगावकरांनो, साफसफाई संदर्भातील वॉटरग्रेसच्या अटी, नियम तुम्हाला माहितीये का?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेने वॉटरग्रेस या कंपनीला जळगाव शहराची साफसफाई करण्यासाठी गेल्या सव्वा तीन वर्षापासून मक्ता दिलेला आहे. हा मक्ता देताना करारनाम्यात दंडाविषयी काही अटी, शर्ती संबंधित ठेकेदाराला घालून देण्यात आल्या आहेत मात्र दंडात्मक कारवाईच्या अटी, शर्ती जळगावकरांना माहितीच नसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला त्याचा विसर पडल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

वाचा काय आहे अटी, शर्ती

नैसर्गिक आपत्ती उदा. महापुर, भुकंप तसेच सार्वजनिक बंद, कामगारांना संप इत्यादी ठेकेदाराच्या आवाक्याबाहेरील कारणामुळे काम बंद राहिल्यास ठेकेदारास दंड आकारला जाणार नाही मात्र ठेकेदाराची अकार्यक्षमता अथवा बेजबाबदारपणामुळे तसेच कामगारांच्या व ठेकेदारामध्ये काही वाद निर्माण होऊन कामगारांनी संप करुन काम बंद केल्यास ठेकेदारास दंड आकारला जाईल. सदर बंद कालावधीत महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था केल्यामुळे जादा खर्च करावा लागल्यास सदरचा खर्च ठेकेदाराच्या मासिक देयकातून वसूल करण्यात येईल. तसेच कामगारांनी केलेल्या संपाकरीता मक्तेदार जबाबदार आहे किंवा हे ठरविण्याचा अधिकार म.न.पा. आयुक्त यांना असेल.

प्रभागामध्ये सकाळी ७.०० वाजता घंटागाडी व रिफुयज कॉम्पॅक्टर इ. वाहने पाठविणे आवश्यक असून प्रभागात निर्धारित वेळेत घंटागाडी पाठविण्यात कसूर केल्यास पर्यायी वाहनाअभावी काम बंद राहिल्यास चारचाकी घंटागाडीकरीता प्रतिदिन प्रतिवाहन रु.३०००/- दंड आकारण्यात येईल. तसेच रिपुयज कॉम्पॅक्टरला प्रतीदिन प्रति वाहन रु.५०००/- स्किप लोडरला प्रती दिन प्रती वाहन रु.२०००/- दंड आकरण्यात येईल व सदर रक्कम देयकातून कपात करण्यात येईल. दंडाची रक्कम देयकापेक्षा जास्त असल्यास मक्तेदारास म.न.पा. खात्यात भरावी लागेल.

घंटागाडी, रिफ्युज कॉम्पॅक्टर, स्किप लोडर इ. वाहनावर कामगार पुरवठा न केल्यास प्रतिकामगार प्रतिदिन रु.५००/- दंड आकारण्यात येईल.

नियुक्त कामगारास दरमहा वेतन १० तारखेनंतर उशिरा झाल्यास प्रती कामगार प्रतिदिन रु.१००/- दंड वसूल करण्यात येईल.

वाहनांवर लावण्यात आलेले जी.पी.एस. व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बंद ठेवल्यास प्रतिदिन प्रतीवाहन रु. ५००/- दंड वसूल करण्यात येईल. तांत्रिक कारणास्तव जी.पी.एस. बंद राहिल्यास सक्षम अधिकाऱ्याच्या खात्रीनंतर दंड शितील करण्यात येईल.

मक्तेदाराच्या वाहनाने संकलीत केलेल्या कचऱ्यामध्ये गाळ, दगड मिश्रीत कचरा आढळून आल्यास रु.५०००/- प्रती वाहन या प्रमाणे दंड आकारणी करण्यात येईल.

घंटागाडीद्वारे निश्चित केलेल्या फेरीमधील रुटप्रमाणे गल्ली सोडल्यास प्रती गल्ली रु.१००/- दंड आकारण्यात येईल.

दैनंदिन कामकाजाच्या वेळेत कचरा कंटेनरच्या इतरत्र कचरा आढळून आल्यास रु.५००/- प्रती ठिकाण दंड करण्यात येईल.

\ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलन न केल्यास रु.२०००/- प्रती घंटागाडी दंड करण्यात येईल.

कामगारांची दैनंदिन हजेरी BIO-MATRIC पध्दतीने घेणे बंधनकारक राहील. तशी व्यवस्था न केल्यास प्रती दिवस रु. २०००/- प्रती ठिकाण दंड आकारण्यात येईल.

दैनंदिन दंडाची रक्कम मासिक देयकाचे २% पेक्षा जास्त असल्यास म.न.पा. तर्फे नोटीस देवून ७ दिवसांत खुलासा मागविण्यांत येईल.

दंडाच्या रकमेत सतत ३ महिन्यात सुधारणा न झाल्यास दंडाच्या रक्कमेत दुप्पट वाढ करण्यात येईल.

अंतिम नोटीस देवून सुध्दा मक्तेदाराच्या कामकाजात सुधारणा दिसून न आल्यास अनामत रक्कम जप्त करुन मक्ता रद्द करणे तसेच काळा यादीत समावेश करणे बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्त ज.श.म.न.पा यांचा राहिल व उर्वरित कालावधीसाठी मक्तेदाराच्या जोखिम व हमीवर (At risk and cost of contractor) काम करुन घेण्यात येईल व त्यापोटी येणारा वाढीव खर्च मक्तेदाराकडून वसूल करण्यात येईल.

नियुक्त कामगारास दरमहा वेतन १० तारखेनंतर उशिरा झाल्यास प्रती कामगार प्रतिदिन रु.१००/- दंड वसूल करण्यात येईल.

मक्तेदाराने कामगारांना गणवेश व गमबुट, दरमहा हॅण्डग्लोज व मास्क, पावसाळयात रेनकोट देणे बंधनकारक राहील. कामगारांनी गणवेश परिधान केला नसल्यास प्रती कामगार, प्रती साहित्यांसाठी रु.१००/- या प्रमाणे दंड आकारण्यात येईल.

मक्तेदाराने दैनंदिन साफ सफाईचे कामात एखादी गल्ली / बोळातील झाडू काम झालेले नाही असे निर्देशास आल्यास प्रती गल्ली / बोळ रु.१००/- प्रतीदिन दंड आकारण्यात येईल.

मक्तेदाराने दैनंदिन गटार साफ सफाईचे कामात एखादी गल्ली / बोळातील गटारीचा गाळ काढला नसल्याचे निदर्शननास आल्यास प्रती गटार रु.२००/- दंड व गटारातील गाळ उचलला न गेल्यास रु.१००/- दंड आकारण्यात येईल.

मक्तेदाराने दैनंदिन झाडू काम व गटार कामाकरीता मजूर पुरवठा करतेवेळी मजूर संख्या मध्ये मजूरांचा पुरवठा कमी केल्यास प्रती मजूर रु.५००/- दंड आकारण्यात येईल.

मक्तेदाराने दैनंदिन कचरा गोळा करुन वाहतूक करतांना कोणत्याही प्रकारचा कचरा जाळतांना आढळल्यास रु.१०००/- प्रती ठिकाण याप्रमाणे दंड आकारण्यात येईल. जनजागृतीपर संदेश व स्लोगन प्रसारीत करणाऱ्या घंटागाडीवरील एम्लीफायर व स्पिकर बंद पडल्यास किंवा बिघाड झाल्यास त्याच दिवशी दुरुस्त करुन लावणे आवश्यक राहिल. अन्यथा प्रती दिन रु. ५००/- प्रती वाहन दंड आकारण्यात येईल.