सोमवार, डिसेंबर 11, 2023

शुभवार्ता ! जळगावकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार, ‘या’ तारखेपासून दमदार पाऊस होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२३ । यंदा मान्सून पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे आता नेमका पाऊस कधी पडतो याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. मात्र पावसाबाबत हवामान खात्याने एक शुभवार्ता दिली असून गेल्या अनेक दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या जळगावकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

जिल्ह्यात २५ ते १ जुलै दरम्यान दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज विविध हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा तर मिळणारच आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांची चिंतादेखील काही अंशी या पावसामुळे मिटण्याची शक्यता आहे.

राज्यातील या भागात पुढील ४ ते ५ पावसाचा अंदाज?
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार असा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुढे ७२ तासांमध्ये होणार असून येत्या दोन तीन दिवसात मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यातील हवामान बदलणार असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जळगावात जुलै महिन्यात होणार इतका पाऊस?
यंदा जून महिन्याचा चौथा आठवडा सुरू असतानाही जिल्ह्यात मान्सूनच्या सरी कोसळल्या नाहीत. दरवर्षी दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यात २० जूनपर्यंत केवळ १७ मिमी पाऊस झाला असून, जून महिन्याच्या एकूण सरासरीपेक्षा तब्बल १०६ मिमी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

उकाड्यापासून सध्या मिळतोय दिलासा?
जळगावात सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. मंगळवारी तापमानाचा पारा ३९.२ अंश इतका होता. वाऱ्यामुळे उकाडा कमी झाल्याने दिलासा मिळतोय. सध्या जिल्ह्यात पुढील तीन चार दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.