⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | आजपासून जळगाव-पुणे विमानसेवा सुरु ; जाणून घ्या कसे आहेत शेड्युल?

आजपासून जळगाव-पुणे विमानसेवा सुरु ; जाणून घ्या कसे आहेत शेड्युल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । केंद्राच्या उड्डाण ५.० योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीने विमान सेवा सुरू केली आहे. गेल्या महिन्यात गोवा, जळगाव, हैदराबाद अशी आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा सुरू केली आहे. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरु करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सोमवार, २७ मेपासून पुणे येथे विमान सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून चार दिवस ही सेवा राहील. यामुळे जळगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीने विमान सेवा सुरू केली आहे. १८ एप्रिलपासून गोवा, जळगाव, हैदराबाद अशी आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा सुरू केली आहे. जळगावातील व्यापारी व प्रवाशांच्या मागणीनुसार २५ व २६ रोजी जळगाव ते पुणे, अशी विमान सेवा दोन दिवस ट्रायल बेसवर घेण्यात आली. तर २७ मेपासून गोव्यावरून जळगावला तर जळगाववरून पुण्याला व पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला, असे विमान सेवा राहील. तिकिटाचे दर दोन हजार रुपये असणार आहे.

तिकीट बुकिंगला सुरुवात विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमान सेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.