मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

खुशखबर! जळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी बंपर भरती जाहीर, पहा डिटेल्स..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस पाटील पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी बंपर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत आहे. Jalgaon Kotwal Recruitment 2023

इच्छुक आणि पात्र उमेदवाराने मुदतीपूर्व अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. या भरती अंतर्गत तब्बल 344 जागा भरल्या जातील. Jalgaon Kotwal Bharti 2023

भरतीसाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10वी पास असावा. तसेच तो स्थानिक रहिवासी असावा.

वयाची अट :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 जुलै 2023 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.

अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवाराला ₹600/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाला ₹500/- शुल्क भरावे लागेल.

किती पगार मिळेल ?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15000 रुपये इतके मानधन मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : jalgaon.gov.in

जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा