⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रभारीराज संपला

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रभारी राज संपला आहे.

कोरोना काळानंतर अनेकदा विविध कारणांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात प्रभारी राज सुरू होता. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आठ पोलीस निरीक्षक बदलीने आले होते मात्र आचारसंहिता असल्याने त्यांना पोलीस ठाणे देण्यात आलेले नव्हते, दरम्यान अखेर मंगळवारी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले आहे.

बदली आदेशानुसार रामानंद पोलीस निरीक्षकपदी शिल्पा पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी संदीप भटू पाटील, चोपडा ग्रामीणसाठी कावेरी कमलाकर, यावल पोलीस ठाणे राकेश माणगावकर, जिल्हा विधी शाखा रंगनाथ धारबळे, चाळीसगाव ग्रामीण बबन आव्हाड, धरणगाव पोलीस ठाणे उद्धव डमाळे, भडगाव पोलीस ठाणे राजेंद्र पाटील, एरंडोल पोलीस ठाणे सतीश गोराडे अमळनेर पोलीस ठाणे विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाणे जयपाल हिरे, जिल्हा पेठ पोलीस ठाणे ज्ञानेश्वर जाधव, सायबर पोलीस ठाणे अशोक उत्तेकर, नियंत्रण कक्ष संजय ठेंगे यांच्या नियमित व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत तर शनिपेठ पोलीस ठाणे शंकर शेळके, पाचोरा पोलीस ठाणे राहुल खताळ व चोपडा शहर पोलीस ठाणे कांतीलाल पाटील यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या असून त्यात मानव संसाधन विभागात सुनंदा पाटील, वाचक एसडीपीओ चाळीसगाव आशा जाधव, भुसावळ तालुका पोलीस ठाणे अमोल पवार, एमआयडीसी पोलीस ठाणे अमोल मोरे, जळगाव शहर पोलीस ठाणे किशोर पवार, भुसावळ शहर पोलीस ठाणे निलेश गायकवाड, यावल पोलीस ठाणे विनोद कुमार गोसावी, रावेर पोलीस ठाणे शितल कुमार नाईक, सावदा पोलीस ठाणे जालिंदर पळे, अडावद पोलीस ठाणे गणेश बुवा, एमआयडीसी पोलीस ठाणे रामेश्वर मोताळे यांची प्रशासकीय व मुदतवाढ म्हणून बदली झाली आहे. तसेच जिल्हापेठ पोलीस ठाणे किरण दांडगे, शहर वाहतूक शाखा संदीप हजारे, धरणगाव पोलीस ठाणे प्रमोद कठोरे तर मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप दुनगहू यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे

जिल्ह्यातील १५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये अमळनेर पोलीस ठाणे भैय्यासाहेब देशमुख, डायल 112 गणेश अहिरे, सावदा पोलीस ठाणे विनोद खांडबहाले, पाचोरा पोलीस ठाणे विजया बसावे, यावल पोलीस ठाणे अविनाश दहिफळे, मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप चेडे, नियंत्रण कक्ष गोकुळ गवारे यांना प्रशासकीय व नियमित पदस्थापना देण्यात आली आहे तर स्थानिक गुन्हे शाखा गणेश चौभे, सावदा पोलीस ठाणे शांताराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा गणेश वाघमारे, वाचक परस्पर उपविभाग सुनील वाणी, शनिपेठ पोलीस ठाणे प्रदीप चांदलकर, जिल्हा जिविशा के.परविन तडवी, आर्थिक गुन्हे शाखा सुदाम काकडे, शनिपेठ पोलीस ठाणे अमोल देवडे यांची विनंती वरून बदली करण्यात आली आहे.