जळगाव पीपल्स को-ऑप बँकेत 12वी/पदवीधरांना मोठी संधी, विविध पदांसाठी भरती ; अर्ज कसा कराल?

जुलै 6, 2025 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जळगाव पीपल्स को-ऑप बँक मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी ते पदवीधरांना बँकेत नोकरी संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. www.jpcbank.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. Jalgaon Peoples Co-Op Bank Bharti

jpcb

ही पदे भरली जाणार?
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख – वसुली (डीजीएम/जीएम), बँकिंग आणि प्रशासन (डीजीएम/जीएम), ट्रेझरी डीलर (सीएम/एजीएम/डीजीएम), मुख्य वित्तीय अधिकारी (एजीएम/डीजीएम), बोर्ड सचिव, मुख्य अनुपालन अधिकारी (एजीएम/जीएम), मुख्य जोखीम अधिकारी (डीजीएम/जीएम), प्रमुख (एचआर) (सीएम/एजीएम/डीजीएम),आयटी डेव्हलपर्स (स्थान जळगाव/मुंबई), डेटा विश्लेषक, जोखीम व्यवस्थापन अधिकारी, शाखा बँकिंग अधिकारी, कायदा अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, विपणन अधिकारी, स्वयंसहाय्यता गट समन्वयक, ग्राफिक डिझायनर आणि डीटीपी ऑपरेटर

कोण अर्ज करू शकतो?
पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. बारावी पास ते पदवीधर तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतो. आवश्यक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी

वयोमर्यादा: 45 ते 55 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट – https://www.jpcbank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now