⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | जळगाव तापणार : उन्हाळा पारा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता

जळगाव तापणार : उन्हाळा पारा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२३ । यंदा बदलत्या हवामानामुळे ऐन उन्हाळ्यात कडक उन्ह, मुसळधार पाऊस व गारपीट‎ असा बदल दिसून आला. गेल्या महिन्याच्या एप्रिल महिन्यात अवकाळीच्या ढगांमुळे तापमानाचा पारा ४२.४ ‎अंश सेल्सिअस पर्यंत राहिला. तर ३० पैकी नऊ दिवस पारा‎ चाळिशी पार गेला. पण आता मे महिन्यात पंधरा दिवस तापमानाचा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात निर्माण‎ झालेली दबावाची स्थिती आणि बाष्पयुक्त‎ ढगांची निर्मिती या मुळे ही गेल्या एप्रिल महिन्यात गारपीट झाली.‎एप्रिल महिन्यात किमान तापमान हे १९‎ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले तर कमाल‎ तापमान हे ४२.४ डिग्रीपर्यंत पोहोचले.‎

सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि‎ संध्याकाळ झाली की पावसाळा असे‎ तीनही ऋतूंची अनुभूती देणारा एप्रिल‎ महिना ठरला. दरम्यान, या तापमानाच्या‎ चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान‎ झाले. १२ ते १७ आणि १९ ते २१ एप्रिल असे‎ नऊ दिवस पारा चाळीशीपार गेला होता.‎

चक्रीवादळातून दिलासा‎
येत्या ७ ते ९ मे दरम्यान बंगालच्या‎ उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ‎ निर्माण होण्याची शक्यता आहे. या‎ स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या‎ किनारपट्टी लगत होऊ शकतो. मात्र,‎ जळगाव जिल्ह्यावर त्याचा परिणाम‎ हाेणार नाही असा अंदाज आहे.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.