---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जळगावमधून स्मिताताई वाघ मोठ्या मताधिक्यांनी विजयी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी तब्बल जवळपास २ लाख मतांनी आघाडी घेतली असून विजय मिळविला आहे. यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

smita tai loksabah result jpg webp

यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरुद्ध नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार रिंगणात होते. करण पवार यांना जळगावचे तिकिट मिळाल्यानंतर प्रचाराचा एकच धडाका उडवून दिल्यामुळे आधी भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक ही अंतिम फेरीपर्यंत मोठ्या चुरशीची बनली.

---Advertisement---

शिवसेना-उबाठा पक्षाचे उमेदवार करण पवार यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. त्यांच्यासाठी थेट उध्दव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर प्रचारात अजून रंगत आली. तर स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची धुरा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे आमदार राजूमामा भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार-पदाधिकाऱ्यांनी सांभाळली.

त्यांना महायुतीच्या तिन्ही मंत्र्यांचे पाठबळ देखील मिळाले. यानुसार, निवडणूक ही मोठ्या चुरशीची झाली असून महायुतीच्या स्मिताताई वाघ आणि महाविकास आघाडीचे करण बाळासाहेब पाटील यांच्यापैकी नेमकी कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. यात दुपारी तीन वाजेपर्यंत स्मिताताई वाघ यांनी जवळपास दीड लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना ५,१०,४७२ मते मिळाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांना ३ लाख १४ हजार ६७० मते मिळालेली आहे. त्यानुसार स्मिताताई वाघ यांनी तब्बल दोन लाख मतांनी लीड घेतली असून विजय मिळविला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---