अबब..! जळगावमध्ये एकाच दिवशी चांदी दरात भलीमोठी वाढ, सोनेही वधारले.. आता भाव काय?

सप्टेंबर 21, 2025 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२५ । सोने आणि चांदीच्या किमती दररोज चढ-उतार होतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना नवीनतम दर तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. दरम्यान मागच्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या किमती दररोज विक्रमी उच्चांक गाठत आहेत. शनिवारी जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीच्या किमतीत एकाच दिवसात तीन हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीने नवा विक्रम केला. तर सोन्यातही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले.

gold rate 2

आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात सोन्याने सकारात्मक सुरुवात केल्याने खरेदीत लक्षणीय वाढ दिसून आली. सध्या दिसणारी किंमतवाढ ही डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या कमजोरीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या मजबूत स्थितीमुळे झाली आहे. एकीकडे सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने सोन्याच्या खरेदीत पारंपरिक उत्साह दिसून येतो, मात्र वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खर्चावर ताण पडण्याची शक्यता देखील आहे.

काय आहे सोन्या-चांदीचा दर?

शनिवारी सोने दरात ८२४ रूपयांनी वाढ नोंदवली गेल्याने सोने पूर्ववत १ लाख १४ हजार ८४५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरीकडे चांदीत तब्बल ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३६ हजार ९९० रूपयांच्या नव्या उच्चांकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत चांदीत एवढी वाढ नोंदवण्यात आली नव्हती. ऐन दसरा, दिवाळी आणि आगामी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची किंमत कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांसह व्यावसायिकांची त्यामुळे निराशा झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now