जळगावमध्ये सोनं 4000 रुपयांनी तर चांदी 15000 रुपयांनी स्वस्त; ‘हा’ आहेत नवीन दर

एप्रिल 2, 2026 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२६ । अमेरिका–इस्राइल–इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेवरही दिसून आला आहे. बुधवारी दरवाढ झाल्यानंतर आज गुरुवारी मात्र सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

gold silver 1

जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची घट होऊन दर प्रतिकिलो २ लाख ३० हजार रुपये इतके खाली आले आहेत. तर सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण होऊन १ तोळा सोन्याचा दर १ लाख ५० हजारांवरून १ लाख ४६ हजार रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, सतत वाढणाऱ्या दरांमुळे काही दिवसांपासून ग्राहकांनी खरेदी टाळली होती. मात्र आज दर कमी झाल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणाव कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now