जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२५ । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात प्रति तोळा ५०० रुपयांची घसरण झाली. तर चांदी दरात प्रति किलो १००० रुपयाची घसरण नोंदविण्यात आली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. जर तुम्ही सणासुदीच्या आधी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने आणि चांदीचे नवीनतम दर जाणून घेणे महत्वाचे आहे.

सोन्याचा दर
मागच्या काही दिवसात सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून आली. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही धातूंच्या किमतींनी सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहे. आज बुधवारी सकाळी सोने दरात घसरण झाली. यानंतर २२ कॅरेट सोने दर विनाजीएसटी १०१२२० ( जीएसटीसह १०४२५६) रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १,१०,५०० (जीएसटीसह १,१३,८१५) रुपये इतका आहे. जळगावात मागच्या काही दिवसापूर्वी सोन्याचा दर १,१४,००० पर्यंत पोहोचला होता. हा दर सार्वकालीन ठरला होता.

चांदीचा दर
जळगावात आज सकाळी चांदीचा दर विनाजीएसटी १,२९,००० (१,३२,८७०) रुपये इतका आहे. काल चांदीचा दर १,३०००० रुपयावर होता. त्यात आज १००० रुपयाची घसरण झाली.
दरवाढी मागचे कारणे काय?
भारतातील सोन्याच्या भावावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ज्यात जागतिक बाजारपेठेतील चढउतारांपासून ते अमेरिकन डॉलरची ताकद, आयात खर्च, बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर, आर्थिक स्थिरता, हंगामी किमती, महागाई आणि मागणी-पुरवठा इत्यादींचा समावेश आहे. उच्च चलनवाढीचा दर सोन्याची मागणी वाढवतो आणि उलट, मागणी वाढल्याने त्याची किंमत देखील वाढते. काही जागतिक परिस्थितींव्यतिरिक्त, सोन्याची आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमत भारतातील सोन्याच्या धातूच्या किमतीवर देखील परिणाम करते. इतर कोणत्याही उत्पादनाप्रमाणे, मागणी आणि पुरवठा देखील सोन्याच्या भावावर परिणाम करते. सोन्याची मागणी आणि पुरवठा वाढल्याने त्याच्या किमती देखील वाढल्या आहेत.










