या आठवड्यात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महागली; जळगावमध्ये आता भाव काय?

सप्टेंबर 14, 2025 7:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२५ । सणासुदीत अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. गणेशोत्सवनंतर आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सारखे सण अगदी काही दिवसावर येऊन ठेपले आहे. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्यासह चांदीचे भाव गगनाला भिडले आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे सोन्यासह चांदी दराने नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे. Gold Silver Rate Today

gold rate 2

या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने दरात जवळपास २४०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली. तर चांदी दरात तब्बल ५ हजार रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो इतकी वाढ झाली. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १ लाख १० हजार ३०० रुपये प्रति तोळा इतका आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (८ सप्टेंबर) १ लाख ८ हजार रुपये इतका होता.

तर सध्या चांदीचा दर विनाजीएसटी १ लाख ३० रुपये प्रति किलो इतका आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (८ सप्टेंबर) चांदीचा एक किलोचा दर १ लाख २४ हजार ५०० रुपये इतका होता.

सध्या सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कामगार बाजारातून येणारे कमकुवत संकेत या निर्णयाला आधार देत आहेत.

दरम्यान, सोने आणि चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. लग्न सोहळे तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now