Gold Silver Rate :जळगावमध्ये चांदीने मोडला रेकॉर्ड; सोन्याचे दरही गगनाला, आताचे भाव वाचून फुटेल घाम

जुलै 13, 2025 8:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२५ । सोने-चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. ती म्हणजे जळगावच्या सुवर्णबाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडलेत. आता सोन्यापाठोपाठ चांदी दराने मोठी झेप घेतली आहे.

gold silver 1 jpg webp

जळगावच्या सराफ बाजारात मागच्या दोन दिवसात सोने तोळ्यामागे १०३० रुपयांनी तर चांदी तब्बल ५१५० हजार रुपयांनी महागली. त्यामुळे सराफा बाजाराच्या इतिहासात चांदीचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे. .या दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होत नसले तरी वायदा बाजारातील (कमोडिटी मार्केट) नफेखोरी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान सध्या सोन्यासह चांदी दरात वाढ होत असलयाने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.

सोन्याचा दर

गुरुवारी प्रतितोळा ९७३०० (जीएसटीसह १,००, २१९) असलेले सोने शुक्रवारी ४१२ रुपयांनी वाढून ९७,७०० (जीएसटीसह १,००,६३१) रुपयांवर गेले. रात्रीतून ते आणखी ६१८ रुपयांनी वाढून ९८,३०० (जीएसटीसह १,०१,२४९) वर पोहोचले आहे. दोन दिवसात सोने १०३० रुपयांनी वाढले.

चांदीचा दर

गुरुवारी १,०८,००० (जीएसटीसह १,११, २४०) रुपये किलो असलेली चांदी शुक्रवारी ३ हजारांनी वाढून १,११,००० (जीएसटीसह १,१४, ३३०) रुपये किलो झाली. चांदीतही रात्रीतून पुन्हा २ हजारांची वाढ होऊन ती १,१३,००० (जीएसटीसह १,१६,३९०) रुपयांवर पोहोचली. गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल ५,१५० रुपयांची वाढ झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now