बोंबला ! चांदी ३००० तर सोने ४०० रुपयांनी महागले, जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे दर पहा..

जुलै 12, 2025 9:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । या आठवड्यात सोन्यासह चांदी दरात मोठा बदल दिसून आला. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. यासोबतच, चांदीच्या दरानेही मोठा आकडा ओलांडला आहे. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सोने दरात ४०० रुपयांची तर चांदी दरात तब्बल ३००० रुपयांची वाढ झाली.

gold rate 2

त्यामुळे आता सणासुदीचे दिवस जवळ येताना ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल हे नक्की. ट्रम्प सरकारने पुन्हा टेरिफ रेटचे नवे धोरण जाहीर केल्याने त्याचे परिणाम थेट सराफ बाजारावर झाल्याचे बोलले जात आहे.

आताचे सोने आणि चांदीचे दर?

जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात शुक्रवारी ४०० रुपयांची वाढ झाली. यानंतर १० ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी ९७७०० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ३००० रुपयांनी वाढून १११००० रुपयावर पोहोचला. चांदीचा हा नवीन उच्चांक असून, या पूर्वी १८ जून रोजी चांदी एक लाख १० हजार रुपयांवर होती. दुसरीकडे ९ जुलै रोजी ९६ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १० जुलै रोजी ७०० रुपयांची व ११ जुलै रोजी ४०० रुपये अशी दोन दिवसांत एकूण एक हजार १०० रुपयांची वाढ झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now