जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२५ । ऐन सणासुदीत सोन्यासह चांदीच्या दरात होत असलेली वाढ सुरूच असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्यासह चांदी दराने ऐतिहासिक पातळी गाठली असून यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी १६०० रुपयांनी वाढलेले सोने मंगळवारी पुन्हा १४४२ रुपयांनी महागले. चांदीच्या दरातही १ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली.

काय आहे सोने चांदीचे भाव?
यामुळे आज बुधवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर १०९९०० (जीएसटीसह ११३१९७) रुपये तोळा झाले. दोन दिवसात सोने ३०४२ रुपयांनी वाढले. चांदी १२६००० (जीएसटीसह १२९७८०) रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दोन्ही धातूचे मंगळवारचे दर हे सर्वकालीन उच्चांकी दर ठरले.

अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे सोन्याची तेजी दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी असल्यामुळे आणखी दरवाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.










