जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेने ; तीन दिवसात झाली मोठी वाढ

जून 22, 2024 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२४ । गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने आणि चांदीच्या दरात या आठवड्याच्या शेवटी दरवाढीची कसर भरुन काढली. मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली. सोन्याने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. जळगाव सुवर्णपेठेत तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे. तर या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वाढले आहे. यामुळे सोन्याचा दर पुन्हा ७३ हजार रुपयावर गेला आहे.

gold silver 1 jpg webp

या दरवाढीमुळे जळगाव सराफ बाजारात आता २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७३,१०० रुपयांवर पोहोचला आहे. तर जीएसटीसह हा दर ७५,२९५ रुपयांवर गेला आहे.दुसरीकडे चांदी विनाजीएसटी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. १४ जून रोजी चांदी ८८ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर चार दिवस पुन्हा चढ-उतार सुरू राहिला व १८ रोजी ती ८९ हजार रुपयांवर आली. १९ व २० जून रोजी प्रत्येकी एक एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९१ हजार रुपयांवर पोहोचली. शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

दुसरीकडे सोन्याचेही भाव तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारले आहेत. १९ जून रोजी ७२ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्यात २० रोजी ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ७३ हजार रुपये प्रति तोळा झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now