जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । मौल्यवान धातूंमध्ये चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा झटका बसला आहे. मागील तीन दिवसांच्या घसरणीनंतर जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे भाव दोन दिवसांत ७०० रुपयांनी वधारले आहेत. चांदीदेखील १ हजार रुपयांनी महागली आहे.
जळगावात सोन्याच्या भावात ८ रोजी १ हजार ४०० रुपयांची आणि १० जून रोजी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ७१ हजार ३०० रुपयांवर आले. त्यानंतर मंगळवारी ५०० रुपयांची आणि बुधवारी २०० रुपयांची वाढ होऊन सोने आता ७२ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे
आज काय आहेत भाव :
सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७२ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीही महागली आहे. सध्या एक किलो चांदीचा दर ९१,००० रुपयावर पोहोचली आहे.