जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने जोरदार मुंसडी मारली असून या दरवाढीने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. जागतिक पातळीवर घडत असलेल्या आर्थिक घडामोडीमुळे दोन्ही धातूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. जळगावात सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ७२ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.सोबतच चांदीनेही ८२ हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. आज तुम्ही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी लेटेस्ट दर जाणून घ्या.
सोने आणि चांदीने आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत. दरम्यान साडेतीन मुहूर्त पैकी प्रमुख एक मुहूर्त मानल्या जात असलेला गुढी पाडव्याच्या मुहूर्त जळगावमध्ये सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. यंदा मात्र सोन्याचे दर विनाजीएसटी ७२,२०० रुपयावर तर जीएसटीसह ७४००० रुपयांच्यावर जाऊन पोहोचल्याने सोने खरेदी मुहूर्तालाच ग्राहकांची प्रतीक्षा सोने व्यावसायिक याना करावी लागत असल्याचं पाहायला मिळाले.
चांदीने देखील दरवाढीची गुडी उभारली. जळगावात चांदीचा दर विनाजीएसटीचा ८२००० रुपयावर तर जीएसटीसह ८४५०० रुपये प्रति किलो इतक्यावर गेला आहे. सध्या लग्नसराईचा काळ आहे, लग्नसराईत सोने-चांदी खरेदीला खास महत्त्व दिलं जातं. मात्र यातच सोने चांदीने मोठी उसळी घेतल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे.