जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२५ । रक्षाबंधन सारख्या सणासुदीच्या मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने नवीन विक्रम नोंदवला आहे. दोन्ही मौल्यवान धातुने तुफान भरारी घेतल्यामुळे ग्राहकांचे उरलेसुरले खरेदीचे अवसान गळाले आहे. टॅरिफ वारचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर १०१६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह तुम्हाला १०४६८४ रुपये मोजावे लागेल. त्याचबरोबर २२ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदी तुम्हाला ९३,१७३ रुपये मोजावे लागणार. तर जीएसटीसह हा दर ९५९६८ रुपये मोजावे लागणार. दुसरीकडे चांदीसाठी सुद्धा ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. आज सकाळी एक किलो चांदी खरेदीसाठी तुम्हाला विनाजीएसटी ११६००० रुपये मोजावे लागणार तर जीएसटीसह ११९४८० रुपये इतका आहे

या आठवड्यात सोने दरात जवळपास २००० रुपये प्रति तोळा इतकी वाढ झाली. तर चांदी दरात तब्बल ४००० रुपयांपेक्षा अधिकची वाढ दिसून आली. एन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने महागले आहे. सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ४ हजार ६८४ रुपयांवर पोहोचले असून हे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत.टॅरिफ इम्पॅक्टमुळे सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि या शुभ दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक या दिवशी सोने-चांदी खरेदी करतात, कारण यामुळे घरात सुख-समृद्धी येते, असा लोकांचा विश्वास आहे. मात्र त्यापूर्वी सोने चांदीचे दर गगनाला भिडले असून दरवाढीने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.










