सोन्या-चांदीने ग्राहकांना घाम फोडला; जळगावच्या सुवर्णबाजारात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मे 6, 2026 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२६ । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी झटका देणारी बातमी आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किमतीत अनपेक्षित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. जळगावच्या सुवर्ण नगरीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल २९ हजार रुपयांची (प्रति १० तोळे) वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात किलोमागे ७ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

gold

जळगावच्या सराफ बाजारात आज २४ कॅरेटच्या १ तोळा (१० ग्रॅम) सोन्याच्या दरात थेट २ हजार ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज जळगावात १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह १,५५,२२१ रुपये खर्च करावे लागत आहेत.याच गतीने १० तोळा सोन्याच्या दरात २९,००० रुपयांची वाढ झाली असून, १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज जीएसटीसह तब्बल १५,५२,२१० रुपये मोजावे लागत आहेत.

चांदीच्या दरानेही गाठला उच्चांक

सोन्यापाठोपाठ चांदीनेही ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. आज जळगावात १ ग्रॅम चांदीच्या दरात ७० रुपयांची वाढ झाली. तर १ किलो चांदीच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. या दरवाढीनंतर जळगावात आज १ किलो चांदीचा दर जीएसटीसह २,५८,३५० रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात पुढच्या काही दिवसांत अजून वाढ होण्याची शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now