जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान अवघ्या एक दिवसांवर आपल्या गणपती बाप्पाची आगमन होणार असून मात्र ऐन गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत मंगळवार २६ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव ४०० रुपये प्रति तोळ्याने वाढला आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहे.

२२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर?
गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याने पुढचे काही दिवस हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली. आज झालेल्या वाढीनंतर २४ कॅरेट सोन्याचे दर १००८०० (जीएसटीसह १०३८२४) रुपये प्रति १० इतका आहेत. तसेच २२ कॅरेट सोने दरात आज ३६० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. त्यानंतर आता २२ कॅरेट सोन्याचा दर ९२३३० रुपये इतका आहे.

दुसरीकडे आज चांदी दर स्थिर आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी १,१७,५०० रुपये इतका आहे. दरम्यान, सध्या गणेशोत्सवात अनेकजण सोने खरेदी करतात. ज्यांच्या घरात गणपती बसतात ते गणपती बाप्पाासाठी सोने खरेदी करतात. परंतु गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
भारतातील सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय किमती, आयात शुल्क, कर आणि डॉलर-रुपया विनिमय दर यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. यामुळेच सोन्याचे दर दररोज बदलत राहतात. भारतीय संस्कृतीत सोने हे केवळ दागिनेच नाही तर गुंतवणूक आणि बचतीचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. लग्न आणि सणांमध्ये त्याची मोठी मागणी असते.












