जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली. मात्र यातच गरिबांचे सोने म्हणून ओळखले जाणारे चांदीचे दर आता गगनाला भिडले आहेत. जळगाव सुवर्णबाजारात चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. काल सोमवारी सोने दरात ४०० रुपयाची तर चांदी दरात एक हजार रुपयाची वाढ झाली. Gold Silver Price Today

आजचा दर काय?
आज मंगळवारी सकाळच्या सत्रात जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९०४७८ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९८७०० रुपये (जीएसटीसह १०१६६१) प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. दरम्यान चांदीचा दर प्रति किलो १,१४,००० (जीएसटीसह ११७४२०) रुपयांवर पोहोचला आहे. हा चांदीचा सर्वकालीन उच्चांकी दर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने गेल्या पाच दिवसांपासून चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. १० जुलै रोजी एक हजार, ११ जुलै रोजी एक हजार ५००, १२ जुलै रोजी २००० रुपयांची वाढ झाल्याने चांदी एक लाख १२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. १३ जुलै रोजी ती याच भावावर स्थिर होती. मात्र, काल १४ जुलै रोजी पुन्हा वाढ झाली व चांदीचा एक किलोचा दर जीएसटीसह १ लाख १७ हजारांवर पोहोचला
दरवाढीचे कारण काय?
सोने आणि चांदी दरवाढीमागे अमेरिकन कर धोरणाबाबतचा संभ्रम व इस्रायल- हमास यांच्यातील युद्धाचा भडका ही दोन प्रमुख कारणे असल्याचे आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारीदेखील यामध्ये वाढ दिसून आली.












