जळगावात सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, आताचा प्रति तोळ्याचा दर किती?

मे 2, 2026 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२६ । सध्या राज्यात लग्नसराईची मोठी धामधूम सुरू असून यासाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. मात्र सध्या दोन्ही धातूंचे गगनाला भिडल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, अशातच ग्राहकांना आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळी सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली.

gold silver 1

मागच्या काही दिवसापूर्वी मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली होती. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मोठी मागणी वाढल्याने जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याने दीड लाख, तर चांदीने अडीच लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. युद्ध थांबल्यानंतर किंवा त्यातील तणाव निवळल्यानंतर दोन्ही धातूंचे दर उच्चांकापासून बरेच खाली आले आहे.

आज शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोन्याचा दर १,२३६ रुपयांनी घसरला आहे यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,२९४ रुपयांपर्यंत खाली आले. तसेच चांदीत ३,०९० रुपयांची घट होऊन जीएसटीसह प्रति किलो २,५७,५०० रुपयांपर्यंत खाली आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now