ऐन दिवाळीत सोनं-चांदीने विक्रम गाठला; जळगावमध्ये आजचे नवीन दर काय?

ऑक्टोबर 19, 2025 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात काल धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोने दरात ३ हजारांनी तर चांदीत ७ हजारांची घसरण झालीय. मात्र अद्यापही सोन्यासह चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

gold rate 2

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर १,२८,००० रुपये इतके झाले आहे. हे सोनं जीएसटीसह १,३२,८४० रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. तर आज २२ करेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,१७,२५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. १ किलो चांदींचे दर १,६९,००० रुपयांवर गेले आहेत. ही चांदी खरेदीसाठी जीएसटीसह १,७४,०७० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान दिवाळी आता अवघ्या दोन दिवसांवर आली असून यादरम्यान सोन्याचे दर काहीसे कमी होण्याची प्रतीक्षा ग्राहकांना आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात तब्बल विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षी सोन्याचा दर ८० हजार रुपयांच्या घरात होते. तर यंदा ते १,३२,८४० इतके झाले आहे. तब्बल यामध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर चांदीचा दर मागच्या वर्षी ९६ हजार रुपये इतका होता. सध्या तो दर ७८ हजारांनी वाढून तब्बल १,७४,००० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now