बापरे! चांदीमध्ये तब्बल 9500 रुपयांची वाढ, सोनेही वधारले.. जळगावमध्ये आताचे दर काय?

नोव्हेंबर 13, 2025 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२५ । दिवाळीदरम्यान विक्रमी पातळी गाठलेल्या सोने-चांदीच्या भावात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा सोने-चांदीच्या भावात वाढ होणे सुरू झाले. जळगावच्या सुवर्णपेठेत तीन दिवसांत चांदीमध्ये तब्बल ९५०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यातही मोठी वाढ झाली आहे. एकीकडे तुळसी विवाहानंतर लग्नसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. लग्नसराईत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, भाववाढीने लग्न असलेल्या घरांचे बजेट कोलमडले आहे.

gold silver 1 jpg webp

जळगाव सराफ बाजारात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून घसरण सुरू झालेल्या सोने-चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरुवातीपासून दरवाढ दिसून आली. १० आणि ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत सोन्याच्या भावात चार हजार रुपयांची वाढ होऊन ११ नोव्हेंबर रोजी ते एक लाख २४ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र १२ नोव्हेंबर रोजी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २३ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले.

दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. १० व ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत चांदीमध्ये सात हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ११ रोजी चांदी एक लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. तीन दिवसांत चांदीमध्ये तब्बल नऊ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक बाजरासोबत देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now