⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात एकाच दिवसात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2000 घसरली, आताचे भाव तपासा..

जळगावात एकाच दिवसात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2000 घसरली, आताचे भाव तपासा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । दिवाळीत सोने आणि चांदीच्या किमतींनी ग्राहकांना घाम फोडला होता. मात्र दिवाळीनंतर दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी असून सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली.

जळगावच्या सुवर्णपेठेत एकच दिवसात सोने दरात तब्बल १६०० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदी दरातही घसरण झाली. चांदीचा प्रति किलोचा दर २००० रुपयांनी घसरला आहे. यामुळे ऐन लग्नसराईदरम्यान दर घसरल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरु असून मंगळवारी सोने विनाजीएसटी ७७,७०० रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात १६०० रुपयांची घसरण होऊन आज बुधवारी सकाळच्या सत्रात सोने ७६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तसेच चांदीचा भाव विनाजीएसटी ८९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोने भाव तर महिनाभराच्या नीच्चांकीवर आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी ते ७६ हजारांवर होते. १ नोव्हेंबरपासून सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले.

१२ दिवसांतील सोने भाव पाहिले तर ते ३ हजार ९०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यात १२ नोव्हेंबरची एकाच दिवसातील घसरण् १५०० रुपयांची आहे. गेल्या तीन दिवसाचा विचार केला असता सोने दरात तब्बल २१०० रुपयांची घसरण झाली. चांदी दरात २००० ते २५०० रुपयाची घसरण झालीय.

दरम्यान, काल मंगळवारी तुलसी विवाह संपन्न झाला. यांनतर आता लग्नसराईला सुरुवात होणार असून याकाळात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.