राजस्थानच्या व्यापाऱ्याने जळगावच्या फळ विक्रेत्याला लाखो रुपयात गंडविले

नोव्हेंबर 17, 2025 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगावच्या फळ विक्रेत्याची राजस्थान येथील घाऊक व्यापाऱ्याने जवळपास १३ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

fraud jpg webp

नेमकी कशी झाली फसवणूक?

आदिल खान जाफर खान (वय ३९, रा. आकाशवाणी केंद्रामागे) हे फळ व्यावसायिक आहे. त्यांचे व्यापारी मित्र इम्रान खान शब्बीर खान, फैसल खान फहिम खान तसेच अमोल जाधव यांच्यामुळे राशीद खान (रा. चुरू, राजस्थान) या व्यापाऱ्याशी यापूर्वी सहारनपूर (उप्र.) येथे आंब्याची खरेदी करण्यासाठी गेले असताना ओळख झाली होती. सप्टेंबर महिन्यात असणाऱ्या नवरात्रीत सफरचंद फळाला मागणी जास्त असल्याने १६ सप्टेंबर रोजी आदिल खान यांनी राशीद यांच्याशी संपर्क करून सफरचंदाची ऑर्डर द्यायची आहे, असे सांगितले.

त्यावर राशीदखान याने व्हिडिओ कॉल करून सफरचंदाचा माल दाखवला. त्यात वेगवेगळ्या प्रतीच्या मालाच्या ५९०, १०७, ५२१ व ३० असे १२४८ क्रेट व १३० पेटी सफरचंदाची ऑर्डर आदिल खान यांनी दिली. त्यासाठी त्यांनी राशीदच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खात्यावर जळगावातील व्यापारी मित्रांनी दिलेल्या स्कॅनरद्वारे फोन पे, आरटीजीएसने १६ ते २१ सप्टेंबर या पाच दिवसांत १२,९३,९०० रुपये पाठवले.

नवरात्र काय, दसरा दिवाळी उलटूनही सफरचंदाचा माल आला नाही. आदिल खान यांनी राशीद खानला याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला असता राशीद खानचा भाऊ असलम खान याने फोन घेऊन पैसे मागण्यासाठी फोन केला तर जळगावातून उचलून नेऊन जीवे मारू अशी धमकी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now