जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड-19 (कोरोना रुग्णालय) रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले नॉन-कोविड रुग्णांना पुढील उपचारासाठी राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेले जळगाव जिल्ह्यातील इतर नॉन कोविड खाजगी रुग्णालयांमध्ये टप्प्या टप्प्याने रुग्ण स्थलांतरीत करण्यात यावेत. यासोबत अधिष्ठाता यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग हे तात्पुरत्या स्वरुपात सी-१ वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत.