fbpx

जळगाव जिल्ह्यात १ मे पर्यंत संचारबंदी ; जाणून घ्या संपूर्ण नियमावली एका क्लिकवर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.  दिनांक 14 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8 वाजल्यापासून या संचारबंदीची अंमलबजावणी सुरु झाली असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या संचारबंदीबाबतची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे. या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. एखाद्याने जाणूनबुजून या नियमांचं उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तर जाणून घ्या जिल्ह्यातील संपूर्ण नियमावली काय आहेत…

काय असणार नियम?

1) संचारबंदी व Night Curfew :- (फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये) 

a) दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 08.00 वाजेपासून दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजे पावेतो संपूर्ण जळगांव जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.

b) सदर कालावधीत अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. नागरिकांनी शक्यतो अत्यावश्यक सुविधांसाठी बाहेर पडतांना रहिवास क्षेत्रातच (वार्ड / गाव) संचार करावा.

c) अत्यावश्यक सेवांच्या तपशिल (परिच्छेद 2) मध्ये नमूद केलेल्या सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा सदर कालावधीत बंद राहतील.

d) वरील लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपनी व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक यांना सुट राहील.तथापि संबंधितांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

e) सदर कालावधीत सूट देण्यात आलेल्या सेवा व उपक्रम हे सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपावतो कॉविड

19 नियमावलीचे पालन करण्याचे अधिन राहून सुरु राहतील. (आपत्कालीन / Emergency सेवा पूर्णवेळ 24 तास सुरु राहतील

अत्यावश्यक सेवांचा तपशिल खालीलप्रमाणे :

1) हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेत व कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवेशी संबंधित घटक तसेच सदर सेवेशी संबंधित उत्पादक व वितरणारे डिलर्स,वाहतूक व पुरवठा करणारी यंत्रणा, व्हॅक्सीन उत्पादक व वितरण घटक, सॅनिटायजर, मॉस्क, वैद्यकीय उपकरणे, त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल उत्पादन करणारे घटक व त्या अनुषंगिक सेवा.

2) पशुवैद्यकीय सेवा प्राण्यांचे देखरेख करणारे केंद्र/पेट शॉप्स /व्हेटनरी हॉस्पिटल्स सुरु राहतील, तसेच अंडी, चिकन, मांस, मटन, मासे, जनावरांचा चारा इ विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबींकरीता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने, गोदामे व वाहतूक व्यवस्था, पाळीव प्राण्यांना नैसर्गिक विधीसाठी / व्यायामासाठी घराबाहेर घेऊन जाण्यासाठी तसेच प्राणी कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व जिवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.

3) किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु ठेवता येतील. तथापि खाद्यपदार्थ झाकून ठेवावे. (सर्व आठवडे बाजार बंद राहतील)

4) शीतगृहे / वेअरहाऊसींग सेवा,

5) रेल्वे, टॅक्सी, विमान, ऑटो व सार्वजनिक बस सेवा.

6) दुतावास कार्यालयांशी संबंधित सेवा

7) स्थानिक स्वराज्य संस्थांची मान्सून पूर्व कामे

8) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सेवा

9) RBI व RBI कडून निर्देशित करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा

10) SEBI व SEBI अंतर्गत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर्स संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, गुंतवणूक व क्लिअरींग कार्पोरेशन, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्था

11) दुरसंचार सेवेशी संबंधित देखभाल व दुरुस्ती

(12) माल वाहतूक

13) पाणी पुरवठा सेवा

14) कृषी संबंधित सेवा उदा. शेतीची कामे, खते, बि-बियाणे व शेती संबंधित उपकरणांची दुरुस्ती

15) आयात निर्यात करणारे घटक

16 ) ई कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवा पुरविण्याकरीता)

17) अॅक्रिडेटेड मिडीया

18) पेट्रोलपंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन

19) सर्व कार्गो सेवा

20 ) डाटा सेंटर्स / क्लाऊड सर्व्हिस पुरवठादार / माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा

21 ) शासकीय / खाजगी सुरक्षा सेवा

22) इलेक्ट्रिक व गॅस पुरवठा सेवा

23) एटीएम संबंधित सेवा

24) डाक सेवा

25 ) कस्टम हाऊस एजंट / लसीकरण, औषधी व फार्मास्युटीकलशी संबंधित मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

26) अत्यावश्यक सेवेकरीता कच्चा माल व पॅकोग मटेरीअल पुरवणारे सेवा

27) येणा-या पावसाळयासाठी आवश्यक साहित्य तयार करणारे / विक्री करणारे घटक

28) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणा-या अत्यावश्यक सेवा

29) गॅरेज

वरील सेवा देणा-या सर्व घटकांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था :

a) सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर योग्य प्रकारे मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तींवर रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

b) चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्ती तसेच वाहन चालकावर प्रत्येकी रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

c) प्रत्येक वाहतूक फेरी झाल्यानंतर प्रवासी वाहन निर्जंतुकीकरण करुन घेणे आवश्यक राहील.

d) सर्व सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा चालक यांनी प्लास्टीक शीट / तत्सम प्रकारे प्रवाशांपासून स्वतःचे विलगीकरण केलेले असल्यास त्याला यातून सुट देता येईल.

सुट देण्यात आलेले विभाग :

A) कार्यालये :

खालील नमूद कार्यालयांना सुट राहील.

i) केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासन इत्यादी विभागाशी संलग्न कार्यालये / विभाग

ii) को ऑपरेटीव्ह, पीएसयु व खाजगी बँक

iii) अत्यावश्यक सेवा पुरविणा-या कंपन्या

iv) विमा व मेडीक्लेम कंपन्या

v) औषधी वितरण / निर्मिती / उत्पादन संबंधित कार्यालये

vi) RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्यवर्ती संस्था उदा. स्वतंत्र प्राथमिक डिलर्स, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, फायनान्शीअल मार्केट,

vii) सर्व प्रकारचे Non-Banking वित्तीय संस्था, viii) सर्व सुक्ष्म वित्तीय संस्था

ix) जर सर्व न्यायालये, लवाद किंवा चौकशी समिती कार्यालये सुरु राहतील तर वकिलांच कार्यालय सुरु राहू शकतात.

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये वगळून वरील प्रमाणे नमूद इतर कार्यालयात कॉविड नियमावलीनुसार जास्तीत जास्त 50% कर्मचारी यांची उपस्थिती राहील.

वरील नमूद परिच्छेद 1(b) मध्ये नमूद अत्यावश्यक कारणांशिवाय मुक्तपणे संचार करता येणार नाही.

स्थानिक पातळीवर जर आपत्ती व्यवस्थापन विभागास आवश्यकता वाटली तर इतर कार्यालये सुरु ठेवण्यास सुट देता येईल.

खाजगी वाहतूक :

खाजगी बसेस सहित, खाजगी वाहनांना केवळ अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त वाहतूक करण्यास मनाई असेल.

उल्लंघन करणा-या वाहनांवर रुपये 1000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल.

खाजगी वाहनांना खालील अटी लागू राहतील :

i) RTO द्वारे निर्धारीत करण्यात आलेली पूर्ण प्रवासी क्षमता परंतु उभे राहून प्रवास करण्यावर निर्बंध राहील

ii) सर्व खाजगी वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे.

-रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स :

a) सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स व बार बंद राहतील. (अपवाद जे रहिवासी हॉटेलचे अविभाज्य भाग आहेत.)

b) सर्व रेस्टॉरंट / हॉटेल्स मालकांना केवळ होम डिलीव्हरी सुविधा या केवळ सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. (म्हणजेच कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर नागरिकांना ऑर्डर देण्यास किंवा घेण्याच्या उद्देशाने येता येणार नाही.)

c) रहिवासी हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट व बार हे केवळ in house guest करीता सुरु राहतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत oustside guest यांना परवानगी असणार नाही. तसेच हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले गेस्ट यांना अत्यावश्यक कारण अथवा अत्यावश्यक कार्यालयातील कामकाज करण्यासाठी जाण्यास मुभा राहील.

d) होम डिलीव्हरी सुविधा पुरविणारे सर्व कर्मचारी यांनी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे.

e) बिल्डींग मधील एका पेक्षा जास्त फॅमिली यांना बिल्डींगच्या प्रवेशद्वारापर्यंत अथवा बिल्डींगमधील कर्मचारी मार्फत होम डिलीव्हरी सुविधा घेता येईल. तसेच बिल्डींगमधील कर्मचारी व होम डिलीव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी यांनी कोविड नियमावलींचे पालन करणे आवश्यक राहील.

1) कोविड नियमावलींचे उल्लंघन करणा-या हॉटेलमधील कर्मचा-यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित हॉटेल/ रेस्टॉरंट यांचेवर देखील रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच पुन्हा अशीच चूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात येईल. अशा प्रकारे दंडात्मक कारवाई अन्न प्रशासन, पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी.

उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करणेबाबत :

विक्रीच्या जागेवर खाण्यासाठी कोणासही खाद्यपदार्थाची विक्री करता येणार नाही. तसेच उघडयावरील खाद्यपदार्थ हे व्यवस्थितरित्या झाकून ठेवण्यात यावेत. तथापि पार्सल किंवा होम डिलीव्हरी सुविधा दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत देता येईल.

धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे :

a) सर्व धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.

b) धार्मिक स्थळांवर नियमित पूजा-अर्चा करणा-या व्यक्तींनी त्यांची नियमित पूजा-अर्चा ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश न देता सुरु ठेवावी.

c) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी /सेवक यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार(सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे.

केशकर्तन शॉप / स्पा / सलून / ब्युटी पार्लर :

केशकर्तन शॉप / स्पा / सलून / ब्यूटी पार्लर इत्यादी आस्थापना बंद राहतील.
वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे.

शाळा व महाविद्यालये :

सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद राहतील.

तथापि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस सुट राहील. परीक्षेचे कामकाज पाहणारा कर्मचारी वर्गाने एकतर लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR /RAT/TruNAT/ CBNAAT चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. असे प्रमाणपत्र 48 तास वैध राहील.

बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याबाहेर घेण्यात येणा-या अशा कोणत्याही परिक्षा ज्या न देणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरु शकते त्याविषयी संबंधित विभागास सुचित करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील

सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील

– धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम :

a) सर्व प्रकारचे धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी असेल.

b) ज्या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यांच्या बाबतीत मेळाव्यासाठी या अटींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल

a) कोणत्याही राजकीय मेळाव्यास भारत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार बंदीस्त सभागृहात 50% लोक किंवा 50 % क्षमतेसह आणि मोकळया जागेत 200 लोक किंवा 50% क्षमतेसह कोविड-19 नियमावलींचे पालन करुन जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेता येईल.

लग्न समारंभ :- 

लग्न समारंभ हे 25 लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येतील.

a) मॅरेज हॉल मधील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR /RAT/ असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.

b) कोविड 19 लसीकरण करुन न घेतलेले व RTPCR /RAT/TruNAT/ CBNAAT चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचा-यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापना यांचेवर देखील रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

c) धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लग्न समारंभ हे अटी व शर्तीस अधिन राहून करता येतील.

अंत्यविधी :

d) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल.

बांधकामाबाबत :

a) बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे अशाच ठिकाणचे बांधकामे सुरु राहतील. कामगारांना ये-जा करण्यास बंदी राहील. तथापि बांधकाम साहित्याची ने-आण करण्यास मुभा राहील.

(b) बांधकामाच्या ठिकाणातील सर्व कामगार / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) एकतर लसीकरण करुन व्यावे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज