⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Jalgaon Crime : होंडा लव्हर दुचाकी चोरटा जाळ्यात, ९ दुचाकी हस्तगत!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । अल्पवयीन बालकाच्या माध्यमातून दुचाकी चोरी करवून विल्हेवाट लावणाऱ्या होंडा लव्हर दुचाकी चोरटाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली असून त्याच्याकडून तब्बल ९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्ह्यात जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने गुन्ह उघडकीचे आदेश किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिल्याने त्यांनी त्यांचे पथकातील पोह जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

अल्पवयीन बालक, दादा बारकु ठाकुर व त्याचा साथीदार अश्यांनी जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करुन धुमाकुळ घातला होता. दोन दिवसापुर्वी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील वरील पथकाने अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्याचे कडून ४ गुन्ह्यांतील मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या. त्यावेळी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोर दादा बारकु ठाकुर याचा शोध घेवून पुढील कारवाई करण्या बाबत आदेश दिले.

त्यावरुन निष्पन्न दोन्ही आरोपीतांचा शोध घेत असताना दादा बारकु ठाकुर हा मिळून आल्याने त्याने त्याचे साथीदार व अल्पवयीन बाकलासह जळगाव जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने ९ मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या असून त्यात १) रामानंद नगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. ११३ / २०२१, २) जिल्हापेठ पो.स्टे CCTNS गु.र.नं. ४९८ / २०२२, ३) धरणगाव पो.स्टे CCTNS गु.र.नं. २३१/२०२२, ४) जामनेर पो.स्टे CCTNS गु.र.नं. १९७/२०२२, ५) एरंडोल पो.स्टे CCTNS गु.र.नं. ८१/२०२२, ६) जिल्हापेठ पो.स्टे CCTNS गु.र.नं. १५७/२०२१, ७) अमळनेर पो.स्टे CCTNS गु.र.नं. १३६/२०२१, ८) अमळनेर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २३७ / २०२१ अश्या गुन्ह्यातील मोटार सायकल काढुन दिल्या आहेत. सदरच्या मोटार सायकल ह्या पुढील कारवाई करीता जिल्हापेठ पो.स्टे. ला जमा करण्यात आल्या आहेत.