शनिवार, डिसेंबर 2, 2023

” शासन आपले दारी ” या कार्यक्रमासाठी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासना तर्फे जय्यत तयारी !

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२३ ।  जळगाव शहर महानगरपालिकेकडून 7 ठिकाणच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली असून सदरील पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली ठिकाणे पुढील प्रमाणे

1) एकलव्य क्रीडा संकुल मैदान
2) जी एस मैदान / छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील
3) नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉप समोरील मैदान
4) सागर पार्क
5) खान्देश सेंट्रल मॉल
6) एस टी वर्कशॉप मैदान
7) ब्रुक ब्रॉन्ड कॉलनी रिंग रोड

प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट( फिरते शौचालय ) तसेच लाईट व्यवस्थित अडीअडचणीसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पिण्याचे टॅंकर, प्रत्येक पार्किंग ठिकाणी 2 शाखा अभियंता यांची नियुक्ती, कचरा संकलनासाठी 1 घंटा गाडी व त्यावर 1 युनिट प्रमुख, प्रत्येक पार्किंग स्थळी 10 सफाई कामगार गार्बेज बॅगसह, 1 मुकादम, अशी स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

महानगरपालिकेतर्फे प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आलेल्या असून त्यामध्ये कक्षात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे.

संपूर्ण शहरात व जळगाव शहरात येणाऱ्या रस्त्यांना दिशादर्शक फलक महानगरपालिका तर्फे लावण्यात आलेले आहे.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे 125 सफाई कर्मचाऱ्यांची( स्वच्छता दुताची ) नियुक्ती करण्यात आलेली असून प्रत्येकी 50 फुटावर 1 कर्मचारी हा युनिफॉर्म मध्ये मैदानावर असेल. तसेच 50 आशा वर्कर्सची नियुक्ती ही लाभार्थी महिलांना मदतीकरिता मैदानावर करण्यात आलेली आहे.

शहरातील पोलीस कवायत मैदानावर मुख्य कार्यक्रम स्थळी 7 फिरते शौचालय (मोबाईल टॉयलेट) महिला व पुरुषांकरिता प्रत्येकी 10 शीट असलेले.

मुख्य कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारापासून पाण्याचे जारची व्यवस्था व तसेच सदरील मैदानावर 10 ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र फॅब्रिकेटर युरिनल (मुतारी) ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरी लाभार्थी करिता 6 बसेसची व्यवस्था केलेली आहे

PMY व DAY-NULM अंतोदय योजना, योजनांची माहिती नागरिकांना/ लाभार्थींना व्हावी यासाठी प्रशासनातर्फे माहिती स्टॉल लावण्यात आलेला आहे. असे मनपा प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे.