Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित ; जाणून घ्या काय आहेत?

daru home dilevery
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 22, 2021 | 6:12 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ ।  सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे.  त्यानुसार मद्यविक्री अनुज्ञप्त्यामधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली आहेत. तसेच नमुना सीएल-3 अनुज्ञप्तीमधुक फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येणार असून त्यासाठी वेळा निश्चित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. 

मद्यविक्री अनुज्ञप्त्यांची विक्री सुरु करण्याच्या व बंद करण्याच्या वेळा

विदेशी मद्याचे ठोक विक्रेते (Fl-1) यांना सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत. देशी मद्याचे ठोक विक्रेते (CL-2) सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर परवाना कक्ष (FL-3), विदेशी मद्याचे किरकोळ विक्रेते (FL-2 संलग्न सीएल/एमएल/टीओडी-3) व देशी मद्याचे किरकोळ विक्रेते (CL-3)  यांना सोमवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुविधा देता येईल यासाठी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

तसेच जे परवाना कक्ष लॉजिंग निवास कक्षाशी संलग्न आहेत त्यांना त्यांच्या संकुलाअंतर्गत निवासी असलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्री दुकान उघडून किंवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास मद्यविक्री दुकानात भेट देता येणार नाही. या विक्रेत्यांव्यतिरिक्त इतर सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती 30 एप्रिल, 2021 पर्यंत बंद राहतील.

कोविड19 संसर्ग प्रतिबंधात्मक उपायोजनेतंर्गत शासनस्तरावर तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेले व यापुढे दिले जाणारे सर्व निर्देश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक असून त्यात कसूर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
jalgaon

अल्पसंख्याक सेवा संघाच्या वतीने दिव्यांग बांधवांना काठ्या वाटप

mayor jayashree mahajan inspected the cleaning of commercial complexes

शहरातील व्यापारी संकुलांची स्वच्छता, महापौरांनी केली पाहणी

corona update

दिलासादायक : आज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.