तृतीयपंथी जगन मामा (राणी जान) यांचे अल्पशा आजाराने निधन

ऑगस्ट 2, 2021 2:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मधील वरिष्ठ तृतीयपंथी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. जगन मामा यांच्या निधनाने तृतीयपंथीयांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

jagan mama

जळगाव शहरातील तृतीयपंथी समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर रहिवासी आहे. मागिल तीन महिण्यापासून ते आजारी होते. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहात्या घरी निधन झाले.

आज दुपारी 2 वाजता जगन मामा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/561639611653524

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now