पोरीबाळींच्या मागे लागून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाता येत नाही
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आ.गिरीश महाजनांना टोला
जळगाव लाईव्ह न्युज । १४ एप्रिल २०२२ । आमदार गिरीश महाजन हे मुख्यमंत्रिपदावरून माझ्यावर खिल्ली उडवीत आहेत मात्र मी किमान त्या पदापर्यंत तरी गेलो, कुणी पोरीबाळींच्या मागे लागून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही, अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी करीत गिरीश महाजन यांना टोला लगावला.
खडसे यांनी सांगितले की, मी गिरीश महाजन यांना सल्ला दिला होता की, डिझेल,पेट्रोल महागले आहे. यासंदर्भात मोर्चा काढला असता तर बरे झाले असते. मात्र ही बाब त्यांच्या जिव्हारी लागण्याचे कारण नव्हते, त्यांचे आंदोलन म्हणजे नुसती नौटंकी असते. ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. मागील कालखंडात कापसाला सात हजार प्रति क्विंटल भाव देऊ असे त्यांनी सांगितले होते. मात्र सरकारमध्ये असताना देखील भाव मिळाला नाही, मंत्री असतानाही मिळाला नाही. नुसती नौटंकी असते, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येण्यासाठी लायकी असली पाहिजे. योग्यता,मेहनत, सर्वपक्षीय मान्यता पाहिजे. नुसत पोरीबाळींच्या मागे लागून कोणी मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या शर्यतीत जात नाही. एकनाथराव खडसे त्याच्या मेहनतीने,जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गेला आणि याचा मला अभिमान आहे की उत्तर महाराष्ट्रातून एक तरी व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गेला.
देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये माझी सर्वात मोलाची मदत झालेली होती. तेव्हा विधान मंडळामध्ये देवेंद्र फडणवीस पाचव्या क्रमांकाच्या टेबलावर बसत होते मी त्यांना माझ्या मागच्या टेबल वर बसण्यास मदत केली. वारंवार त्यांना विधानसभेमध्ये बोलायला संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता पण मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी संमती दिली आणि माझ्या संमतीसाठी अडून पडलेलं होतं असे अनेक प्रकार आहेत की देवेंद्र फडवणीस यांना या ठिकाणी मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली.
ते मुख्यमंत्री झाले तरी मी त्यांचं स्वागतच केलं. असे असताना सुद्धा माझ्या मागे अशा स्वरूपाच्या चौकशा,बदनामी करण्याचा प्रयत्न करणं, त्या ठिकाणी अंडरवर्डशी माझे संबंध आहे. दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण आहे. माझ्या पीए ने लाच घेतली, मी भूखंडात गैरव्यवहार केला, असे खोटे आरोप केले, माझे तिकीट कापले गेलं, माझ्याकडे ईडी ची कारवाई झाली, मला वारंवार छळण्याचा प्रकार या ठिकाणी कुणाच्यातरी आशीर्वादाने झाला, यापेक्षा यांच्या आशीर्वादाने झालेला दिसतो आहे आणि त्यामुळे मी त्या गाण्यांमध्ये म्हटलं की त्यांनी या ठिकाणी मी जी मदत केली त्यांनी मला या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे म्हटलेले आहे. एकनाथराव खडसे व्यक्तिगत दुश्मन आहे अशा वरून माझा छळ केला जातो यामुळे मी निषेध केला असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार साहेबांच्या दौऱ्या निमित्त त्यांनी सांगितले कि, जिल्ह्यामध्ये एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने दौरा आहे. माजी आमदार मुरलीधर पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी त्या ठिकाणी ते येत आहेत. त्यानिमित्त हा जाहीर कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. नंतर समाजसेविका प्रतिभा शिंदे यांनी महिला मेळावा घेतलेला आहे. त्या मेळाव्याला उपस्थिती देणार आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेब येत आहे. त्यामुळे एक नवचैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जळगाव जिल्ह्यामध्ये आता सुरू असल्याचे हि त्यानी सांगितले.