जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । हिंदुत्व येडा – गबाळ्याच काम नाही. ते तुम्हालाच झेपणार नाही. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या तमाम विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाचा हुंकार सभा मुंबईच्या बीकेसी मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या आधी महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्व विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांनी शिवसेना मोठी झाली आहे. आता तुम्ही हे हिंदुत्व अंगावर घ्यायचा प्रयत्न करू नका. हिंदुत्व ही काही कोणा येडा गबाळ्याचे काम नाही. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली.
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नुकतेच सुरू झाली आहे. सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप-प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्याने दिलेले आव्हान, ओवैसीचा कबर मुद्दा या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेत घेतील असा अंदाज आहे.