⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वरणगावात आज कुस्त्यांची दंगल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । वरणगाव येथील हनुमान व्यायाम शाळेतर्फे हनुमान जयंती निमित्त मंगळवारी (दि.१९) दुपारी २ वाजेपासून कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

व्यायाम शाळेत नुकतिच याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात जयंती मिरवणूक अध्यक्षपदी श्रीराम पहेलवान व उपाध्यपदी अक्षय माळी, सचिव वैभव मेढे, कोषाध्यक्ष प्रणव बाऊस्कर, प्रमुख सल्लागार प्रशांत निकम, भैय्या सोनवणे, भिवाजी बाऊस्कर, बाळासाहेब चव्हाण, तर सदस्यपदी किरण माळी, संकेत माळी, गणेश भोई, नीरज चौधरी, अजय तायडे, प्रवीण माळी, राहुल राखुंडे, सुरेन्द्र बाऊस्कर, विकास सोनवणे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कुस्त्यांच्या जंगी सामन्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार मंगळवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर कुस्त्यांचे जंगी सामने होणार आहेत. त्यात प्रामुख्याने रामा पहिलवान (सांगली ) व राकेशकुमार पहिलवान (हरियाणा) यांच्यातील लढतीची उत्सुकता आहे. तसेच जिल्ह्यातील वैभव पहिलवान, सागर पहिलवान, हर्षल पहिलवान, राज पहिलवान, नितिन गवळी, विनोद पहिलवान, कुणाल यादव, अक्षय पहिलवान, राहुल पहिलवान, प्रणव पहिलवान, संकेत पहिलवान, शोएब पहिलवान, प्रणव पहिलवान, अर्जुन पहिलवान, विशाल पहिलवान, सोनू पहिलवान यांच्या लढती होणार आहेत. पंच म्हणून दिलीप पहिलवान, संजय पहिलवान, ईस्माईल पहिलवान, एकनाथ पहिलवान, नामदेव पहिलवान काम पाहणार आहेत. कोरोनाच्या काळानंतर प्रथमच शहरात कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे वरणगाव परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.

आयोजन बैठकीला यांची होती उपस्थिती

बैठकीला नामदेव मोरे, सुपडु सोनवणे, सुनील काळे, एकनाथ भोई, चुडामण वाघ, विनोद झोप, दिनेश देशमुख, शंकर पटेल, संजय चौधरी, ईस्माईल पहिलवार आदी उपस्थित होते. परिसरातील कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक मंडळाने केले आहे.