सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी पदभरती; भरघोस पगार मिळेल

ऑक्टोबर 17, 2025 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारताच्या राष्ट्रीय अंतराळ संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) अंतर्गत येणारे अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र SHAR (SDSC SHAR) ने विविध पदभरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण १४१ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ISRO SDSC SHAR Bharti 2025

ISRO SDSC 1

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आणि अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट shar.gov.in किंवा apps.shar.gov.in ला भेट देऊन अंतिम मुदतीपूर्वी पदांसाठी अर्ज करू शकतात.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट/इंजिनियर SC23
2टेक्निकल असिस्टंट28
3सायंटिफिक असिस्टंट03
4लायब्ररी असिस्टंट ‘A’01
5रेडिओग्राफर01
6टेक्निशियन-B70
7ड्राफ्ट्समन-B02
8कुक03
9फायरमन-A06
10लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’03
11नर्स-B01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह M.E/M.Tech/M.Sc (Engg) (Machine Design/Industrial Engineering/Electrical & Electronics Engineering/Chemical Engineering) किंवा M.Sc (Atmospheric Science/ Meteorology/Analytical Chemistry)
पद क्र.2: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical/Mechanical/ Mechanical/Automobile/Electrical Engineering / Electrical & Electronics/Civil/Computer Science & Engineering/Electronics & Communication Engineering)
पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Sc. (Chemistry/Computer Science) किंवा प्रथम श्रेणी पदवी (Fine Arts
(Photography) / Visual Arts (Cinematography)
पद क्र.4: ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: प्रथम श्रेणी रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [(Chemical/Attendant Operator (Chemical)/Attendant Operator (Chemical)/Maintenance Mechanic (Chemical Plant)/Laboratory Assistant
(Chemical)/Electrician/Fitter/Civil Engineering Assistant/Refrigeration and Air
Conditioning/Pump Operator Cum Mechanic/Photograhy/Digital Photograhy/ Electronic Mechanic/Boiler Attendant/Diesel Mechanic/Instrument Mechanic]
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Draughtsman-Civil)
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 05 वर्षे अनुभव
पद क्र.11: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क : [SC/ST/ExSM/PWD/महिला: Full Fee Refund]
पद क्र.1 ते 4 & 11: General/OBC: ₹750/-
पद क्र.5 ते 10: General/OBC: ₹500/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now