ISRO Bharti : पदवी पास उमेदवारांना केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. तब्बल 522 पदे रिक्त

जानेवारी 4, 2023 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ISRO ने एक उत्तम संधी आणली आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अनेक पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे. ISRO Recruitment 2023

isro bharti jpg webp

ISRO Bharti 2023 : एकूण पदे – ५२२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट 339
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट 153
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

3) उच्च श्रेणी लिपिक 16
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

4) स्टेनोग्राफर 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

5) असिस्टंट (स्वायत्त संस्था) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

6) पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

वयाची अट: 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड कशी होईल आणि फी किती आहे
लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. प्रथम लेखी परीक्षा होईल, त्यात उत्तीर्ण होणारे उमेदवार कौशल्य चाचणी देऊ शकतील. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. इतर कोणत्याही विषयावर तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now