जामनेरमध्ये आयपीएल सट्ट्याचा पर्दाफाश ! १० लाखांच्या मुद्देमालासह चौघे ताब्यात

मे 10, 2026 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टेबाजी खेळणाऱ्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली. जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील या सट्टा अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

sattaipl

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेतला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी मोबाईल फोन आणि विविध ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून सट्टा व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले.

या धाडीत पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, तसेच ४१ एटीएम कार्ड असा मुद्देमाल हस्तगत केला. इतर साहित्यांसह एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे, सर्व रा. जामनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले चौघांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now