जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हीही दहावी पास असाल आणि केंद्रीय सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये पदभरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो. Intelligence Bureau Bharti 2025

इंटेलिजेंस ब्युरोने सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच २६ जुलै पासून सुरु होणार आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. Intelligence Bureau Recruitment 2025

पदाचे नाव : सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता काय?
1) उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
2) या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करू इच्छित आहे त्या राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
3) उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
वयाची अट :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १७ ऑगस्ट २०२५ रोजी किमान वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
पगार : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या इतर भत्त्यांसह वेतन स्तर ३ नुसार दरमहा २१७०० ते ६९१०० रुपये दिले जातील.
परीक्षा शुल्क :
या भरतीमध्ये अर्ज भरण्यासोबतच, सर्व उमेदवारांना परीक्षा प्रक्रिया शुल्क म्हणून ५५० रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्कासह ६५० रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे, अशा परिस्थितीत त्यांना ५५० रुपये जमा करावे लागतील.
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |












